#Accident

केज शहरातील तरुण शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू…..!

6 / 100 SEO Score
केज दि.२८ – येथील रहिवासी तथा तालुक्यातील नांदूर घाट येथील मूकबधिर विद्यालयामध्ये शिक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या एका तरुण शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.
            केज शहरातील रहिवासी खमरोद्दिन सदरोद्दीन फारुखी (३८) हे तालुक्यातील नांदूर घाट येथील मूकबधिर शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होते. मात्र शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान शाळेतून केज कडे येत असताना केज बीड रोडवरील बरड फाट्यानजीक दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या झालेल्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. सदरील अपघात झाल्यानंतर त्यांना लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र शनिवारी पहाटे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
           दरम्यान शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांना परिचित असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून खमरुद्दीन फारोखी यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यविधी केज येथील फारोखी कब्रस्तानमध्ये चारच्या दरम्यान करण्यात येणार आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close