महाराष्ट्र
मनसेचे अस्तित्व सुपारीवर -परब
मुंबई दि.२४ – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनंतर आता शिवसेनेने देखील मिशन मुंबई हाती घेतलंय. या निवडणूकीत भाजपा-मनसे संभाव्य युतीविषयी बोलताना शिवसेनेने मनसेवर सडकून टीका केली आहे.
शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले, “मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही याबाबत कल्पना नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही.”कोणाची तरी सुपारी मनसेला घ्यावीच लागेल. कारण मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे, आतापर्यंत मनसेने अनेक पक्षांची सुपारी घेतली असल्याचा आरोप,” देखील अनिल परब यांनी केला.
परब पुढे म्हणाले, “लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून भाजपा नेत्यांना उघडंनागडं केलं. त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल.”