आहार विहार

अद्भूत शोध…….. आता खा कोंबडी न कापता चिकन…….! 

चिकन-मटण खायला अनेकांना आवडतं पण केवळ यामध्ये मुक्या प्राण्यांचा जीव जातो त्यामुळे अनेकजण मांस खाणं टाळतात. पण आता या देशात मुक्या प्राणी-पक्षांना मारल्याशिवाय मांस खाण्याचा आनंद घेता येणार आहे. एका रेस्टॉरंटमध्ये लॅबमध्ये तयार केलेलं कोंबडीचं मांस विकलं जात आहे. सिंगापूरमध्ये हा प्रयोग केला जातो आहे. ज्याठिकाणी अशाप्रकारचं चिकन विकलं जातं आहे, त्या रेस्टॉरंटचं नाव 1980 आहे. सिंगापूरमध्ये लॅबमध्ये बनवल्या जाणाऱ्या चिकनसाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी मान्यता देणारा सिंगापूर जगातील पहिला देश आहे. प्रयोगशाळेत कोंबडीच्या पेशींपासून तयार झालेल्या या मांसाला क्लीन मीट (Clean Meat) असं म्हणतात. याठिकाणी प्रयोगशाळेत चिकन बनवण्याचं काम इट जस्ट (Eat Just) या अमेरिकन स्टार्टअप कडून केलं जात आहे. सध्या चिकन नगेट्स  (Chicken Nuggets) तयार करण्यात आले होते.

                 हे चिकन नगेट्स खाणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की खरं चिकन आणि हे लॅबमध्ये बनवण्यात आलेलं चिकन याच्या टेक्सचरमध्ये काहीच फरक नाही आहे. चिकनची मागणी सर्वाधिक असताना पर्यावरण आणि जनावरांच्या बचावासाठी अशाप्रकारे लॅबमधील चिकन एक उत्तम पर्याय ठरू शकतो, मांसची कमतरता पूर्ण करण्यात हे लॅबमधील चिकन महत्त्वाची भूमिका निभावेल असं या स्टार्टअपचं म्हणणं आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close