#mucormycosis

‘म्युकर मायकोसिस’शी झुंज देणाऱ्या केज तालुक्यातील शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज……! 

दानशूरांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन

केज दि.२५ – तालुक्यातील होळ येथील एका अल्पभूधारक शेतकर्‍याची ‘म्युकर मायकोसिस’शी झुंज सुरू आहे. परंतू, उपचारासाठी लागणार्‍या महागड्या इंजेक्शनकरिता आता पैसेच नाहीत म्हणून उपचार थांबविण्याची वेळ आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी, असे कळकळीचे आवाहन शेतकर्‍याची कुटुंबीयांनी केले आहे.
                 चंद्रकांत उर्फ बंडू गोवर्धन शिंदे (वय ४५) असे उपचार घेत असलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांना होळमध्ये २ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्या कुटुंबात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आहे. त्यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यापासून कुटुंबातील इतर सदस्य ही बाधित झाले. त्यांच्या मुलीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. तर ‘म्युकर मायकोसिस’ची लक्षणे दिसून येताच १० मे रोजी औरंगाबादला हलविण्यात आले. तेथील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. परंतू, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अर्धवट उपचार घेऊन ते घरी परतले.
                  पतीच्या उपचारासाठी आतापर्यंत साडे चार लाख रुपये खर्च झाले. ऊसने, काही व्याजाने पैसे घेऊन आजवर उपचार केले. परंतू, आता आमची परिस्थिती नाही, त्यामुळे उपचार पूर्ण न करताच पतीला घरी घेऊन आले. काही नातेवाईक, ग्रामस्थांनी धीर दिल्याने व आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मी पतीला आता परत रुग्णालयात दाखल करत आहे. उपचारासाठी मदत करावी असे आवाहन चंद्रकांत शिंदे यांच्या पत्नी उमा शिंदे यांनी केले आहे.
आणखी तीन लाख रुपये लागणार
आतापर्यंत साडे चार लाख रूपये खर्च झाला असून यापुढे ही आणखी 3 लाख रुपये खर्च होणार आहेत. ‘अँफोटेरेसिन बी’ हे 8 हजार रुपये किंमत असलेले 30 इंजेक्शन आवश्यक आहेत. सध्या पैसे नसल्यामुळे उपचार थांबले आहेत.
                         चंद्रकांत शिंदे यांना उपचारासाठी आर्थिक मदत लागणार असल्याचे समजताच दोन तासात ग्रामस्थांनी 1 लाख रुपये जमा केले होते. आणखी काही मदत जमा करणे सुरू आहे. इतरांनी ही पुढे येऊन आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
मदतीसाठी बँक खाते माहिती
Name : Uma Chandrakant Shinde
Bank a/c : 80043579444
IFSC Code : MAHG0004517
Branch : At. Hoal Tq. Kaij Dist. Beed

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close