उंदरी येथील बालासाहेब दादाराव ठोंबरे हे कामानिमित्त गावातील विना नंबरच्या अप्पेरिक्षाने ७ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धारूरकडे निघाले होते. भरधाव वेगाने रिक्षा घेऊन जात असताना उंदरी – धारूर रस्त्यावरील शिवाजी ठोंबरे यांच्या शेताजवळ चालक विशाल सतीश ठोंबरे याच्या हायगयी व निष्काळजीपणामुळे अपेरिक्षा पलटी झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बालासाहेब दादाराव ठोंबरे यांचा मृत्यू झाला. मयताचा पुतण्या प्रशांत सर्जेराव ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून अपेरिक्षा चालक विशाल ठोंबरे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानोबा साठे हे करीत आहेत.