पंचायत समिती अंतर्गत पंचायत समिती सभागृहात केज तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व रमाई आवास योजना (ग्रामीण) मधील विहीत वेळेत ज्या लाभधारकांनी घरकुल बांधकाम पुर्ण केले अशा निवडक लाभार्थ्यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्रक देऊन पंचायत समितीच्या सभापती परिमाळा विश्वनाथ घुले, गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्या यांच्या हस्ते सत्कार करण्याात आला.
कार्यक्रमास सभापती परिमाला घुले यांच्यासह पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, घरकुल विभागातील सर्व कर्मचारी वृंद तसेच पंचायत समिती कर्मचारी उपस्थीत होते.