केज येथे सहायक निबंधक संस्था कार्यालयात कानडी माळी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन व व्हॉइस चेअरमन यांची निवडणूक पार पडली. यावेळी मधुकर महादेव राऊत, जालिंदर दगडू राऊत, मोहन अण्णासाहेब बनसोडे, मालनबाई सावताराम राऊत, निलावती दत्तू राऊत, शिवाजी भानुदास मस्के, राजपाल वेदप्रकाश राऊत, द्वारकादास भानुदास राऊत, वसंत प्रल्हाद राऊत, अशोक संभू राऊत, गजेंद्र दत्तू गिरी आदी बिनविरोध निवडुन आलेले सभासद उपस्थित होते.
विशेष म्हणजे शिवाजी राऊत यांनी स्वतः चे नामनिर्देशन पत्र परत घेतल्यामुळे सर्व सभासद बिनविरोध निवडून आले होते. तसेच किसन राऊत, भारत राऊत यांनी स्वतः चे नामनिर्देशन पत्र परत घेतल्यामुळे तेरा सभासद संख्या निर्धारित झाली होती.त्यामुळे सदर तिघांचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.
याप्रसंगी रावसाहेब राऊत, बाजीराव राऊत, लक्ष्मण राऊत, रामराव राऊत, बालासाहेब राऊत, अशोक श्रीमंत राऊत, प्रभू आबा राऊत, अभिमान बनसोडे,रंगनाथ राऊत, बबन बनसोडे, अंगद राऊत, दत्तू राऊत, सचिन बनसोडे ल, महादेव पाखरे, प्रा. पांडुरंग राऊत, आकाश राऊत, मसुराम राऊत, राजाभाऊ राऊत, महादेव राऊत, प्रा. सुनील राऊत, प्रा. गोविंद राऊत आदींसह गावकरी बहुसंख्येने उपस्थिती होते.
सदरील निवडीबद्दल रमेश आडसकर यांनी या नवनिर्वाचित पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन केले.