केज दि.२८ – तालुक्यातील कोल्हेवाडी येथील उमेश नरसु मिसाळ हा तरून मागच्या केवळ दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात दाखल झाला होता. आणि आपली सेवा बजावत असताना आणि देश कार्य करत असताना उमेश ला वीरमरण आले. आणि त्यांच्या शहीद होण्याची बातमी बीड जिल्ह्यामध्ये धडकताच अवघा जिल्हा शोक मग्न झाला आणि आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी तालुक्यातील कोल्हेवाडी येथे मोठ्या प्रमाणावर जमा झाला आणि अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये आणि शासकीय इतमामात केज तालुक्याच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.
केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील उमेश नरसू मिसाळ हा तरुण केवळ दोन वर्षांपूर्वीच भारतीय सैन्य दलामध्ये देश सेवेसाठी दाखल झाला होता. आणि तो राजस्थान येथील सुरतगड येथे सेवा बजावत असताना त्याला वीरगती प्राप्त झाली. सदरील जवानाच्या वीरमरणाची बातमी अवघ्या काही वेळेतच संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि केज तालुकाच नव्हे तर अवघा बीड जिल्हा शोकमग्न झाला. उमेश मिसाळ यांचे पार्थिव आज त्यांच्या कोल्हेवाडी या मूळ गावी जेव्हा पोहोचले त्यावेळेस पंचक्रोशीतील नागरिकांसह जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी कोल्हेवाडी कडे धाव घेतली. उमेशला अखेरचा निरोप देण्यासाठी बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्हा माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, केज तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच अन्य राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. आणि यावेळी शहीद उमेशला अमर रहे च्या घोषणा देत डबडबलेल्या डोळ्यांनी सर्वांनी अखेरचा निरोप दिला.
उमेश चे पार्थिव कोल्हेवाडी मध्ये दाखल होण्यापूर्वी संपूर्ण गावकरी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उमेश ची आतुरतेने वाट पाहत होते तर त्याचे पार्थिव ज्या रस्त्याने येणार आहे त्या रस्त्यावर महिलांनी रांगोळी काढली होती. दरम्यान, उमेशचा विवाह केवळ सहा महिन्यांपूर्वी झाला होता.