#Job
डॉ.स्नेहल मोटेगावकर हिची क्लासवन अधिकारी म्हणून निवड….!
केज दि. 26 – आदर्श शिक्षक,कै. रामदासराव मोटेगावकर (गुरुजी) यांची नात व सौ.सुनीता व श्री.शरदराव मोटेगावकर सेवा निवृत्त प्रभारी प्रबंधक व अधीक्षक, अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय,अंबाजोगाई यांची कन्या, कु.डॉ.स्नेहल शरदराव मोटेगावकर यांची महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी वर्ग -१ या पदासाठी पहिल्याच प्रयत्नात निवड झाली.
डॉ. स्नेहल यांनी पदवीचे शिक्षण शासकीय पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ, परभणी येथून पूर्ण केले असून पदव्युत्तर शिक्षण शासकीय पशुवैद्यकीय व पशुविद्यान विद्यापीठ, मुंबई येथे चालू आहे. त्यांच्या यशाबद्दल डॉ. स्नेहल तसेच त्यांचे पालक सौ.सुनिता व श्री. शरदराव रामदासराव मोटेगांवकर यांचं व मोटेगावकर परिवाराचे सामाजिक व शासकीय सर्वच स्तरातून व नाभिक समाज बीड जिल्हा व सर्व नाभिक बांधव यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन होत आहे.
” माझ्या यशामागे कठीण मेहनत व आई-वडील तसेच आजी – आजोबा कै.सत्यभामा व कै.रामदासराव मोटेगावकर(गुरुजी) यांचा मोलाचा वाटा आहे. मला वेळोवेळी भेटलेले शिक्षक, स्नेही जणांचे व कुटुंबियांचे मार्गदर्शन या प्रवासात खूप मोलाचे होते. अशी भावना डॉ.स्नेहल यांनी व्यक्त केली.”