#Job
”या” विभागातही मेगा भरती…..!
मुंबई दि.18 – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. रेल्वेकडून नुकताच या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवण्यात आली आहे. दहावी पास असणारे उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते ते आता लवकरच पूर्ण होणार आहे.
सदरील भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वेकडून राबवण्यात येतेय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 3000 हून अधिक पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. दहावी पाससोबतच उमेदवाराकडे आयटीआय पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावीमध्ये 50 टक्के मार्क घेऊन पास झालेला असावा आणि त्याच्याकडे संबंधित आयटीआय ट्रेडचे प्रमाणपत्र असणेही
आवश्यक आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 3015 जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच अर्ज करावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 15 ते 24 पर्यंत असणे आवश्यक आहे. रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. 2024 साठी या भरती सुरू आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज दाखल करावे लागतील. उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.