#Accident

भाविकांच्या गाडीला भीषण अपघात……!

9 / 100

परभणी दि.१७ –  यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला असून, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.तर सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अडकलेली क्रूजर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

               जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे एकूण 9 जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे 6 जण जखमी झाले असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

                जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे काही भाविक परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दर्शन झाल्यावर हे भाविक पुन्हा जालना जिल्ह्याकडे परत निघाले होते. दरम्यान, रात्रीचा प्रवास सुरु असतानाच भाविकांच्या क्रुझर आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. ज्यात, एकूण 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर 6 भाविक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.

               दरम्यान,  हा अपघात एवढा भीषण होता की, क्रुझरचा समोरील भाग थेट ट्रॅक्टरच्या ट्रालीत जाऊन घुसला. त्यामुळे क्रुझर गाडी बाहेर काढण्यासाठी चक्क जेसीबी बोलवावा लागला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त क्रुझर बाजूला करण्यात आली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close