अद्भूत शोध…….. आता खा कोंबडी न कापता चिकन…….!
चिकन-मटण खायला अनेकांना आवडतं पण केवळ यामध्ये मुक्या प्राण्यांचा जीव जातो त्यामुळे अनेकजण मांस खाणं टाळतात. पण आता या देशात मुक्या प्राणी-पक्षांना मारल्याशिवाय मांस खाण्याचा आनंद घेता येणार आहे. एका रेस्टॉरंटमध्ये लॅबमध्ये तयार केलेलं कोंबडीचं मांस विकलं जात आहे. सिंगापूरमध्ये हा प्रयोग केला जातो आहे. ज्याठिकाणी अशाप्रकारचं चिकन विकलं जातं आहे, त्या रेस्टॉरंटचं नाव 1980 आहे. सिंगापूरमध्ये लॅबमध्ये बनवल्या जाणाऱ्या चिकनसाठी मंजुरी देण्यात आली आहे. अशी मान्यता देणारा सिंगापूर जगातील पहिला देश आहे. प्रयोगशाळेत कोंबडीच्या पेशींपासून तयार झालेल्या या मांसाला क्लीन मीट (Clean Meat) असं म्हणतात. याठिकाणी प्रयोगशाळेत चिकन बनवण्याचं काम इट जस्ट (Eat Just) या अमेरिकन स्टार्टअप कडून केलं जात आहे. सध्या चिकन नगेट्स (Chicken Nuggets) तयार करण्यात आले होते.
हे चिकन नगेट्स खाणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की खरं चिकन आणि हे लॅबमध्ये बनवण्यात आलेलं चिकन याच्या टेक्सचरमध्ये काहीच फरक नाही आहे. चिकनची मागणी सर्वाधिक असताना पर्यावरण आणि जनावरांच्या बचावासाठी अशाप्रकारे लॅबमधील चिकन एक उत्तम पर्याय ठरू शकतो, मांसची कमतरता पूर्ण करण्यात हे लॅबमधील चिकन महत्त्वाची भूमिका निभावेल असं या स्टार्टअपचं म्हणणं आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिलं आहे.