क्राइम

क्षुल्लक कारणावरून एकाचे डोके फोडले……! 

4 / 100
केज दि.१२ – म्हैस लावल्याचे पैसे मागितल्यावरून एका ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याच्या डोक्यात दगड फेकून मारत डोके फोडल्याची घटना आरणगाव ( ता. केज ) येथे १० ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एक जणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        आरणगाव ( ता. केज ) येथील नारायण दौलत सिरसट ( वय ३२ ) या तरुण शेतकऱ्याने १० ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या गावातील ऋषीकेश रामलिंग भांगे यांना म्हैस लावलेले पैसे मागितले. त्यावरून ऋषीकेश याने दगड फेकून नारायण सिरसट यांच्या डोक्यात मारला. त्यात नारायण डोके फुटून गंभीर दुखापत झाली. अशी फिर्याद नारायण सिरसट यांनी दिल्यावरून ऋषीकेश भांगे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close