क्राइम

केज बस स्थानकात चोरीचे सत्र सुरूच….!

Frequently theft in kaij bus stand

6 / 100 SEO Score
केज दि. ५ – येथील बस स्थानकामध्ये चोरीचे सत्र सुरूच आहे. सरासरी दर पंधरा दिवसाला महिलेचे दागिने किंवा पर्स चोरी होण्याच्या  घटना थांबता थांबत नाहीत. आणि यातच पुन्हा लातूर येथील एका व्यक्तीला रुद्राक्ष हातावर ठेवून गंडा घातल्याची  घटना समोर आली आहे.
           रामेश्वर ता.लातूर येथील शिवाजी पंढरी बळवंत हे केज तालुक्यातील टाकळी येथे मुलीला भेटण्यासाठी आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ३० वाजता ते मुलीसह धारूर ला जाण्यासाठी केज बस स्थानकामध्ये आले असता आणि मुलगी धारूरला गाडी किती आहे हे विचारण्यासाठी गेली असता बळवंत यांच्याजवळ एक व्यक्ती आला. यावेळी बळवंत यांच्या हातावर रुद्राक्ष ठेवून बोलण्यात गुंतवले आणि अकरा ग्रॅमची सोन्याचे अंगठी घेऊन एका अनोळखी व्यक्तीने पोबारा केला. सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर बापलेकीने त्या व्यक्तीला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अनोळखी इसम दिसून आला नाही.
              दरम्यान बळवंत यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या घटनेचा तपास जमादार श्री. बिक्कड हे करत आहेत. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही चोरीच्या घटना घडलेल्या आहेत त्याचा अद्यापही सुगावा लागलेला नसून बस स्थानकातील प्रवाशांची सुरक्षितता मागच्या कित्येक वर्षांपासून धोक्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात जास्त महिलांच्या पर्स आणि दागिने चोरीच्या घटना घडलेल्या असून पोलिसांना या टोळीचा मागोवा अद्याप लागलेला दिसून येत नाही. सदरील घटनेतील अनोळखी cctv मध्ये दिसून आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close