राजकीय
चिंचोली माळी गटात सरोजनी ससाने लोकप्रियतेच्या शिखरावर…..!

केज दि.११ – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कित्येकजण कामाला लागले तर कांहीजण शांत बसले आहेत. त्याच अनुषंगाने केज तालुक्यातील चिंचोली माळी गटातही मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू झाली असून सरोजनी दादासाहेब ससाणे यांनी मात्र मतदारांच्या मनात घर निर्माण केल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गटाचे केज विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाने यांच्या पत्नी तथा माजी उप सभापती सरोजनी दादासाहेब ससाणे या चिंचोली माळी गटातून निवडणूक लढवण्यासाठी जोमाने तयारीला लागल्या त्यांच्यासह त्यांचे पती गावोगावाला भेटी देत नागरिकांशी संवाद साधत असल्याने उमेदवारी मिळण्या अगोदरच प्रचाराला मोठी रंगत आली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून गावोगावी आणि घरोघरी नागरिकांच्या भेटीगाठी दरम्यान मतदार देखील त्यांचे स्वागत करत आहेत. ससाने दांपत्य ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ग्रामस्थांच्या अडचणीवर बोलत असल्याने संबंधित ग्रामस्थ पोलीस स्टेशन, सिविल हॉस्पिटल, महावीतरण, पंचायत समिती या ठिकाणी आपल्या काय अडचणी आहेत ? कोणती कामे नडली आहेत ? या संदर्भात माहिती देत आहेत व त्या प्राधान्याने सोडविण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे चिंचोली माळी जि प गटामधील गावागावात त्यांचा दांडगा जन संपर्क आहे. याचा फायदा त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्कीच होईल असे चित्र तरी सध्या दिसू लागले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते रामदास कदम, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मराठवाडा संपर्क प्रमुख माजीमंत्री अर्जुन खोतकर, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडणूक चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातून सरोजनी दादासाहेब ससाणे निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, ससाणे यांनी चिंचोली माळी गटात संपर्क सुरू केल्याने व त्यांना प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक विचारात पडले आहेत.