क्राइम

केज शहरात घरफोडी, नगदी रक्कमेसह दागिने लंपास……!

8 / 100 SEO Score
केज दि.२० – घरी कुणी नसल्याची संधी साधून शहरातील उमरी रोडवरील सहयोग नगर भागातील एक घर फोडून घरातील नगदी रक्कमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी (दि.१९) मध्यरात्री च्या सुमारास घडली आहे.
               शहरातील उमरी रोडवरील सहयोग नगर भागात ज्ञानेश्वर परमेश्वर सोळंके यांचे घर आहे. परंतु रविवारी त्यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधून मध्यरात्री घराचे कुलूप तोडून घरात कपाटात ठेवलेले पन्नास हजार व सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला.
              दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पीएसआय राजेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close