क्राइम

मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपीच्या आवळल्या मुसक्या……!

केज दि.9 – पुणे जिल्ह्यातील राज्य राखीव दलात कार्यरत असलेले जवान सोमेश गोरख धस (रा.सांगवी ता.केज)  हे गावाकडे सुट्टीवर आलेले असताना ते व त्यांची पत्नी हे दोघे स्कुटी वरून जात असताना 9 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वा. त्यांना  केज – बीड रोडवरील सावंतवाडी पाटी टोल नाक्या जवळ तीन चोरट्यांनी मोटरसायकल आडवी लावून मारहाण केली. तसेच गळ्यातील सोने, मोबाईल व रोख रक्कम पळविली असल्याची घटना घडली होती. सदरील घटनेचा माग पोलिसांनी काढला असून आरोपी ताब्यात घेतला आहे.
               दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जोंधळे यांनी त्या ठिकाणचे मोबाईल लोकेशन आधारे माळेगाव येथून दिनेश उर्फ दिन्या नागनाथ काळे रा. मोहा ता कळंब जि उस्मानाबाद याला ताब्यात घेतले आहे. तपासात त्याच्या कडून गुन्ह्यातील रिअलमी कंपनीचा मोबाईल हस्तगत केला. या तपासकामी पोलीस कर्मचारी दुबाले, गायकवाड, पवार व ठोंबरे यांनी सहभाग घेतला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close