क्राइम
केज शहरातील मुख्य रस्त्यावर एकास लुटले…….!
केज दि.10 – येथील बीड रस्त्यालगत असलेल्या हॉटेल अनिल च्या बाजूस थांबलेल्या आंधळे वाडी येथील मुकादामास मारहाण करून त्याच्याकडील दोन लाख पस्तीस हजार व मोबाईल असा एकूण २ लाख ४७ हजार ६०० रुपयाचा ऐवज लुटल्या प्रकरणी केज पोलिसात चौघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बीड रस्त्यालगत असलेल्या हॉटेल अनिलच्या उजव्या बाजूस आंधळे वाडी येथील ऊसतोड मुकादम भागवत उद्धव आंधळे हे थांबलेले असताना ओळखीचा फायदा घेऊन आवेज उर्फ आवड्या खाजा शेख, शाहबाज उर्फ माक्या नसीर कुरेशी, जिशान उर्फ माकड्या फरोक शेख व एक अनोळखी व्यक्ती सर्व रा. केज यांनी शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबरच्या रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास मुकादमास चापटा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याकडील नगदी दोन लाख पस्तीस हजार रुपये व रेडमी कंपनीचा बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे काढून घेतलेल्या पैशाची व मोबाईलची मागणी केली असता त्यांनी ते देण्यास नकार देत तुला काय करायचे कर आम्ही पैसे देणार नाही असे सांगितल्याने केज पोलिसात ऊसतोड मुकादम भागवत उध्दव आंधळे यांच्या तक्रारी वरून वरील चौघा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महादेव गुजर करत आहेत.