क्राइम

परराज्यात नेऊन महिलेवर अत्याचार…..!

अंबाजोगाई दि. ११- (पांडुरंग केंद्रे) आजारातून बरे करण्याचे अमिष दाखवून एका विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना २५ सप्टेंबर ते ८ आक्टोबर या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडली. या प्रकरणी सदरील पिडीत महिलेच्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
                   कृष्णा पिराजी मस्के असे त्या आरोपीचे नाव आहे. पिडीतेच्या फिर्यादीनुसार ती आपल्या पतीसह एका ठिकाणी कामास होती. त्या ठिकाणी कामास असलेल्या कृष्णा मस्के मजुराने या महिलेस तुझा आजार बरा करतो असे अमिष दाखवून बाहेरगावी उजगाव ता. बेळगाव (कर्नाटक) येथे नेले. सदरील महिलेवर तिथे व घाटनांदूर येथे अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने दिली.  सदरील महिलेने दिलेल्या अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी कृष्णा पिराजी मस्के याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून अटक त्यास करण्यात आले आहे. घटनेचा तपास पिंक पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक वैशाली पेटकर या करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close