#Social

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानातून प्रोत्साहन मिळेल – अजित प्रकाश संचेती……!!!

पुणे दि.१६ – पुण्यात एका कबड्डीपट्टू 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बिबेवाडीमध्ये घडली. तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती.मात्र अवघ्या कांही तासातच आरोपी जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.                               नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय सांगली इथे भरती शहरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आणि आशा दबाव आणि प्रचंड तणावाच्या वातावरण असताना तेथील पीआय अनिता हिरवकर व गुन्हे शाखेची टीम बिबवेवाडी पोलीस यांनी बड्या शिताफीने आरोपीना 12 तासात अटक केली. याबद्दल भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महासचिव महा,राज्य अजित संचेती ,दीपक पिंपळे,नवनाथ गापाट, ओंकार यांनी पीआय अनिता हिरवकर व गुन्हे शाखेच्या टीम चा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन दिले.
                       अजित संचेती यांनी पत्रकात असे म्हटले की, पोलीसां बद्दल जनतेच्या मनात असलेल्या कटुता व पोलीस काही काम करत नाही हे दूर व्हावेत यासाठी आम्ही जे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे धाडसी काम करतील अशा अधिकारी व त्यांच्या टीम चा सत्कार आणि अभिनंदन करणार आहोत. यामुळे जनतेच्या मनातली कटुता दूर होईल व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना यामुळे आणखी जोमाने काम करण्याचे प्रोत्साहन मिळेल .

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close