क्राइम

आर्यन खानचा जामीन नाकारला, कोठडीतील मुक्काम वाढला…..! 

मुंबई दि.20 – शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा आज पुन्हा जामीन फेटाळला गेला. 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही. त्यामुळे शाहरुखची डोकेदुखी वाढली आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यनला 13 दिवसानंतरही जामीन का मिळत नाही? त्यामागची  अनेक कारणं सांगण्यात येत आहेत..

यामध्ये आर्यन खान विरोधात एनसीबीकडे सज्जड पुरावे असल्याने त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यासाठी एनसीबीने काही कारणं कोर्टापुढे मांडली आहेत. त्यापैकी एक म्हणजे आर्यन खान हा नियमित ड्रग्ज घेत होता. तो ड्रग्ज घेणारा नियमित ग्राहक होता. अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज सापडलं. तेव्हा आर्यनही त्याच क्रुझवर होता. ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचा तपास करण्यात आला असता त्यात ड्रग्ज रॅकेटशी संबंधित अनेक बाबी एनसीबीला आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं. एका नवोदित अभिनेत्रीसोबतचे आर्यनचे चॅटही एनसीबीच्या हाती लागले आहेत,. त्यातही ड्रग्जवर तो चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेही त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.आर्यनचे इंटरनॅशनल ड्रग्ज पेडलर्ससोबत कनेक्शन असल्याचा दावा एनसीबीने कोर्टात केला आहे. त्याबाबतचे पुरावे आपल्याकडे असल्याचं एनसीबीने म्हटलं आहे. त्याचा अधिक तपास करायचा असल्याने आर्यनला सोडू नये असं एनसीबीचं म्हणणं आहे. तसेच आर्यनचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ड पेडलर्स सोबत कनेक्शन आहेत. तो बाहेर आल्यास पुरावा नष्ट करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी मागणी एनसीबीने केली होती.

दरम्यान, आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी एनसीबीने त्याची कोठडी मागितली आहे. त्यामुळेच कोर्टाने आर्यनची जामीन याचिका फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close