हवामान

अनुदान आले मात्र त्यातही टप्पे……!

बीड दि.26 – राज्यात विशेषतः मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अखेर आले आहे. मात्र दिवाळी गोड करण्याचा शब्द दिलेल्या सरकारने केवळ ७५ % च अनुदान दिले आहे. त्यामुळे हेक्टरी १० हजाराची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या तरी केवळ हेक्टरी ७५०० रुपयेच पडणार आहेत.
राज्यासह मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीपोटी हेक्टरी १० हजाराच्या मदतीची घोषणा शासनाने केली होती. मात्र त्याचा जीआर काढायला शासनाला घोषणेनंतर ८ दिवस लागले. त्यातही शासनाने पंचनाम्याची खुट्टी मारली होती. हे कमी की काय म्हणून आता शासन नुकसानीचे सर्व अनुदान देखील एकाच टप्प्यात देणार नाही. पहिल्या टप्प्यात ७५ % इतकेच अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठीचा राज्यासाठी २ हजार ८६० कोटींचा निधी शासनाने दिला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर सदर निधी वर्ग करण्यात आला आहे.
मराठवाड्यासाठी यातील २ हजार ८२१ कोटी रुपये मंजूर झाले असून बीड  ५०५ कोटी, लातूर ३३६ कोटी, तर उस्मानाबाद २८१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र हे अनुदान मंजूर झाले असले तरी पंचनामे करून लाभार्थी निश्चित करूनच अनुदान वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close