#Social

केजमध्ये तहसिलवर धडकला मोर्चा……!  

 केज दि.12 – त्रिपुरा येथे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचार प्रकरणातील दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी केज येथील मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
      त्रिपुरा येथे मागील जातीय हिंसाचार सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ व सदरील हिंसाचार प्रकरणातील दोषी विरुद्ध कठोर कारवाई या मागणीसाठी केज येथील मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात केली. त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत मोर्चा मंगळवार पेठ, मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चेकऱ्यांचे निवेदन नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांनी स्वीकारले. त्यानंतर मोर्चाचा समारोप हजरत खाजा मोईजोद्दीन दर्गा या ठिकाणी करण्यात आला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close