क्राइम

३२ तोळे सोने चोरीला, केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…..!

1 / 100
केज दि.3 – तालुक्यातील नांदूरघाट येथील एका शिक्षकांच्या घरी ३२ तोळे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
                नांदूरघाट ता. केज येथील शिक्षक विकास किसनराव ढाकणे वय (५१ वर्ष) यांनी त्यांच्या घरातील पलंगाच्या बॉक्स मध्ये ठेवलेले ३२ तोळे सोन्याचे दागिने हे १५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान चोरीला गेले. या ३२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत ही सुमारे १२ लाख४६ हजार रु. एवढी आहे. दि. २९ नोव्हेंबर रोजी त्यानी पलंगाचा बॉक्स उघडून पहिला असता त्यात दागिने आढळून आले नाहीत. त्या नंतर त्यांनी घरात विचारपूस करून शोध घेतला. परंतु दागिने सापडले नाहीत. म्हणून त्यांनी दि. २ डिसेंबर गुरुवार रोजी केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु.र.नं. ५६९/२०२१ नुसार भा.दं.वि. ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close