क्राइम

गजबजलेल्या ठिकाणी भर दिवसा युवकाचा खून…..!

1 / 100
बीड दि.१४ -भर बीड शहरात थरकाप उडवून देणारी घटना घडली. अज्ञात तीन ते चार जणाच्या टोळक्याने एका 24 वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला चढवला. तरुणाच्या अंगावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
               सदरची घटना बसस्थानका समोरील एचडीएफसी बँकेसमोर घडली. बीड शहरातील खासबाग भागात राहणारा 24 वर्षीय शेख शाहिद शेख सत्तार या तरुणावर आज दुपारी 4 वा. बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर तीन ते चार तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले. दिवसाढवळ्या सशस्त्र हल्लेखोरांनी तरुणावर सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हल्लेखोर कोण? याचा शोध पोलीस घेत असून सदरची घटना का व कशासाठी घडली ? हे अद्याप समजू शकलेले नाही.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close