आपला जिल्हा

उद्यापासून बीड जिल्ह्यात ”या” मोटारसायकल स्वारांना मिळणार नाही पेट्रोल……!

1 / 100
बीड दि.३१ – जिल्हयातील वाढते अपघाताचे व वाहन चालक यांचे अपघाती निधन होण्याचे प्रमाण लक्षात घेता, मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, दिनांक 1 जानेवारी 2022 पासुन बीड जिल्हयात NO HELMET NO PETROL लागू करण्यात येत आहे.                                                  उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखानुसार संपुर्ण बीड जिल्हयात मोटार सायकल यांची संख्या 2,40,959 आहे. जागतिक आरोग्य संघटना यांनी वेळोवेळी प्रकाशित केलेल्या वाहनाच्या अपघाताच्या आकडेवारीनुसार भारतात जास्तीत जास्त अपघात हे मोटार सायकलने होत असतात व त्यामध्ये मोटार सायकल चालक हे हेल्मेट न वापरल्या कारणाने त्यांचा मृत्यु होतो व गंभिररित्या जखमी होतात. या मोटार सायकलच्या अपघातामध्ये तरुण मुले व मुली वय 18 ते 35 या वयोगटातील तरुण मुले नाहक प्राण गमावतात. बीड जिल्हयात जानेवारी ते सप्टेंबर 2021 दरम्यान दुचाकीच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 178 आहे, त्यामुळे ही बाब नाकारता येत नाही.
                   दरम्यान, कायद्यातील तरतुदीनुसार दुचाकी वाहन चालक यांना बीड जिल्हयात मोटार सायकल चालवित असतांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात यावे व बीड जिल्हयातील सर्व पेट्रोल पंप चालक/मालक यांना मोटार सायकल धारकाने हेल्मेट परिधान न केल्यास अशा मोटार सायकल धारकांना पेट्रोल देण्यात येवू नये व लोकांमध्ये जागृती करावी व सदर बाबतीत आदेश हे तात्काळ लागू करावेत असे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बीड यांनी काढले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close