#Judgement

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास……!

9 / 100

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयानं हा निर्णय दिला. कारावासासोबत त्यांना 25 हजारांचा दंडही भरावा लागणार आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुंबई येथील एका फ्लॅटची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचं सिद्ध झालंय. भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत 2017 साली तक्रार केली होती.

मुंबईत बच्चू कडू यांनी ४२ लाख ४६ हजाराचा फ्लॅट खरेदी केला होता, पण २०१४ विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता. बच्चू कडू यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते, कर्जाची परतफेड करता न आल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता. आपल्यावरील आरोप खोटे असं असल्याचं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी २०१७ मध्ये केलं होतं.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close