सांगवी येथील महादेव ज्ञानोबा धस हे आष्टीच्या एसटी आगारात बस वाहक पदावर कार्यरत असून त्यांना ‘तू आमच्या बहिणीला शिव्या का देतो असे कारण काढून योगेश ढाकणे, बबलू ढाकणे व पत्नी रागिणी धस यांनी दगडाने व लाथाबुक्याने मारहाण करीत डोके फोडले अशी फिर्याद दिल्यावरून या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, महादेव धस हे दारूच्या व्यसनातून रोज मारहाण करीत असून चारित्र्यावर संशय घेतात. त्यांनी आई, भावास गावी बोलावून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत स्वतःचे डोके फोडून घेत तुमच्यावर हाफमर्डरची केस करतो. अशी धमकी दिली अशी फिर्याद धस यांची पत्नी रागिणी धस यांनी दिल्यावरून महादेव धस यांच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे हे करत आहेत.