#Social

तब्बल दोन वर्षांनी उसळलला जनसागर, लाखो भावीकांचे श्रद्धास्थान फुलले……!

10 / 100

केज दि.१ – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील उत्तरेश्वर पिंप्री देवस्थान कोरोनाच्या प्रकोपात मागच्या दोन वर्षांपासून बंद होते.परंतु यावर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्याने पिंप्री मध्ये आबालवृद्ध मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत.

              दरील ठिकाणी जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातूनही लाखो भाविक दर्शनाला येत असतात.रामायण कालीन विशेष महत्त्व असणारे महादेवाचे मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे.मोठ्या रांगेने दर्शन घेतल्या नंतर लाखो लोक अथांग पसरलेल्या मोकळ्या मैदानात थाटकेल्या वेगवेगळ्या मनोरंजनाच्या ठिकाणी हौसेने भेट देऊन वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्या बरोबर खाऊ गल्लीत जाऊन यथेच्छ ताव मारताना दिसतात.
           दरम्यान तब्बल दोन वर्षानंतर भरलेल्या यात्रेचे गाव प्रशासनाने तगडे नियोजन केलेले दिसून तर आलेच आणि त्याच बरोबर पोलीस प्रशासनानेही योग्य बंदोबस्त ठेवला होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close