हवामान
विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज……!
मुंबई दि.५ – उन्हाळा सुरु झाला असून उन्हाळ्याची झळही बसू लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानात कमालीची वाढ झाल्याचं दिसत आहे. अशातच पुढील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
विकेंडनंतर दोन दिवस कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, आणि जळगाव या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानता बाळगयला सांगितलं आहे. काही महत्त्वाचं काम असेल तरच बाहेर पडा, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अवकाळी पाऊसाचा सपाटा पहायला मिळत आहे. उन्हाची झळ बसत असतानाही पावसानं हजेरी लावली आहे.