महाराष्ट्र

एसटी महामंडळात मेगा भरती, आज हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होणार……!

9 / 100

मुंबई दि.३१ – एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लवकरच एसटी महामंडळात मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती होणार आहे.  अशी माहिती आली आहे. तसेच आज अखेर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून दिलासा आहे.मात्र उद्या पासून एसटी महामंडळातील हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर एसटीने हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात गाड्यांची संख्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  सुमारे 12 हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत. बेस्ट आणि पीएमपीएलच्या धर्तीवर एसटी महामंडळात निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार आहे.  आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सातवेळा संधी दिली मात्र कामावर रूजू न झाल्याने उद्यापासून कारावाईला सुरूवात करणार असल्याची माहिती, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

दरम्यान, अनिल परब म्हणाले,  एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा आज संपत आहे. आज जे कर्मचारी  हजर झालेले  असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. तसेच 11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांच्यावर नियमानुसार केली जाणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close