#Accident

तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या, प्रसिद्ध अभिनेत्री जखमी…..!

12 / 100

अभिनेत्री मलायका आरोराच्या गाडीला शनिवारीमोठा अपघात झालाय. मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही  गाडी असल्याचे दिसून येत आहे. ती बस मनसेच्या कार्यक्रमाला  येणारी बस दिसत आहे. कारण या गाडीवर मनसेचा बॅनर दिसत आहे. या अपघाताचे खळबळजनक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघात तीन गाड्या एकमेकांना धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात मनसेच्या गाडीलाही चांगलचं डॅमेज झालं आहे. पण त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनीच मलाईकाला रुग्णालयात दाखल करण्यास मनसेच्या कार्यकर्त्यांनीच मदत केल्याचाही व्हिडिओ समोर आली आहे. मलाईकाला अपघातानंतर उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर मलायकाच्या बाजुने कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून हा अपघात कसा घडला याचा तपास करून एफआयआर नोंदवला जाईल. “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. या अपघातात तीन वाहनं एकमेकांवर आदळली आणि तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. यात मनसेच्या गाडीचेही मोठं नुकासन झालं आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की यात मलाईकाच्या गाडीच्या मागच्या सर्व काचा फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मलायकाला सध्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून तिचे सिटी स्कॅन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिला पुढेचे काही तास निरिक्षणात ठेवणार असल्याचाही माहिती समोर आली आहे. तिला या अपघातात किती दुखापत झाली आहे. याबाबत कोणतीही ठोस माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र लवकर डॉक्टर याबाबत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लागल्याने तीन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघात मलायकाच्या ड्राईव्हरला आणि बॉडिगार्डला मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. आज मुंबईत मनसेचा मेळावा होता, त्यासाठी सकाळपासून राज्यभरातून मनसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत होते. त्यावेळी त्यांचीही गाडी या अपगाताच्या ठिकाणी दिसून आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close