महाराष्ट्र

खासदार संजय राऊत यांची संपत्ती जप्त, ईडी ची मोठी कारवाई…..!

9 / 100

मुंबई दि.5 – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय. संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे.

            दरम्यान अलिबाग मध्ये आमच्या स्वकष्टाच्या पैशाने खरेदी केलेली एक एक्कारपेक्षा कमी जागा असून दादर मधील आमचे राहते घरही जप्त केल्याचे मी ऐकले आहे. तसेच राजकीय सूडबुद्धीने केलेली ही कारवाई असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close