क्राइम

धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी ”त्या” कीर्तनकार बाबासह महिलेवर गुन्हा दाखल…..!

12 / 100

बीड दि.१२ – समव्यावसायिक क्षेत्रातील महिलेसोबतची अश्लील चित्रफीत व्हायरल झाल्याने अखेर वैजापूरच्या त्या महाराजासह महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मोगल (वय 48, रा. लासूरगाव, ता. वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

                      साधारण चार दिवसांपूर्वी बाळकृष्ण माेगल याच्यासोबत समव्यावसायिक 40 वर्षीय महिलेची अश्लील चित्रफीत गंगापूर, वैजापूर तालुक्यात व्हायरल झाली होती. संबंधित चित्रफीत काही क्षणातच सर्वत्र व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कारण संबंधित चित्रफितीत बाळकृष्ण मोगल आणि समव्यावसायिक महिला नको त्या अवस्थेत दिसून येत होती.

दरम्यान,एका हॉटेलमध्ये विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे पुढे येत आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून, ज्ञानेश्वर माणिकराव खिल्लारे यांच्या फिर्यादीवरून बाळकृष्ण मोगल याच्यासह त्या समव्यावसायिक महिलेवर शिलेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर करत आहेत

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close