हवामान

बळीराजासह सर्वांसाठीच आनंदाची बातमी…….!

6 / 100
मुंबई दि.२५ – मान्सूच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुढील 48 तासांमध्ये मान्सूनचा वेग वाढणार आहे. मान्सूनने अंदबार, निकोबार व्यापल्यानंतर त्याची वाटचाल संथ झाली होती. मान्सून अरबी समुद्रात  अडकला होता. मात्र पुढील 48 तासांमध्ये मान्सूसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून, मान्सूनचा वेग वाढणार आहे.
                   मान्सूसची वाटचाल संथ झाल्याने त्याचा पुढील प्रवास देखील लांबला आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. मात्र हा मान्सूचा पाऊस नसून अवकाळी पाऊस असल्याचे देखील हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे जमीनीच्या मशागतींना वेग आला असून, शेतकरी पेरणीपूर्व कामाला लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मात्र मान्सूचा प्रवास जरी लांबला असला तरी देखील राज्याच्या काही भागात पावसाची रिमझिम सुरू आहे, तर काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. परंतु हा मान्सूचा पाऊस नसून मान्सूनपूर्ण पाऊस असल्याचे हवामान खात्याकडू स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील तीन दिवस राज्यात वीजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
                   दरम्यान सध्या राज्याच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला आहे. पाऊस पडल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून, शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पेरणीपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. अद्याप मान्सून राज्यात दाखल झाला नसून, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीतज्ज्ञाकडून देण्यात येत आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसाचा मोठा फटका हा शेवटच्या टप्प्यातील अंबा पिकाला बसल्याचे पहायला मिळत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close