आपला जिल्हा

जिल्हा नियोजन समितीवर राहुल सोनवणे, राजेसाहेब देशमुख यांना संधी….!

6 / 100
बीड दि. 4 – येथील जिल्हा नियोजन समितीची पुनर्रचना करण्यात आली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल दोघांचेही अभिनंदन करण्यात येत आहे..
                     बीड जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्र्यांच्या निर्देशाने पुनर्रचना करण्यात आली आहे. नियोजन समितीमधील विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. या दोघांचा समावेश सुनील वाघाळकर आणि महादेव धांडे यांच्या जागेवर करण्यात आली आहे. राजेसाहेब देशमुख आणि राहुल सोनवणे दोघानांही राजकारण, समाजकारणाचा अनुभव आहे. तर राजेसाहेब देशमुख यांनी जिल्हा परिषदेत सभापती असताना नियोजन समितीचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम केलेले आहे. या दोघांनाही जिल्हा नियोजन समितीत स्थान मिळाल्याने काँग्रेसमधून आनंद व्यक्त होत आहे.
              त्यांच्या या निवडीबद्दल खासदार रजनी ताई पाटील, माजीमंत्री अशोकराव पाटील,युवानेते आदित्य पाटील यांच्यासह पीडीएस शैक्षणिक संकुलाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत…

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close