क्राइम

मुलाची पित्यास मारहाण, रक्तस्त्राव होऊन पित्याचा मृत्यू…..!  

6 / 100
केज दि.१४ – दारू नेहमी का पितात असे म्हणत मुलाने दारूच्या नशेत पित्याच्या पायाच्या नडगीवर मारहाण केली होती. रक्तस्त्राव होऊन पित्याचा मृत्यू झाल्याची घटना युसुफवडगाव ( ता. केज ) येथे घडली. याप्रकरणी मुलाविरुद्ध कलम ३०४ भादविनुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले आहे.
       युसुफवडगाव येथील मल्हारी निवृत्ती लगसकर याने दारूच्या नशेत १२ जून रोजी मध्यरात्री येऊन वडील निवृत्ती कोंडीबा लगसकर ( वय ६५ ) यांना नेहमी दारू का पितात असे म्हणत त्यांच्या पायाच्या नडगीवर कशाने तरी मारहाण केली होती. पायावर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन रात्रीतून त्यांचा घरीच मृत्यू झाला. युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर त्यांच्या मृत्यूस त्यांचा मुलगा मल्हारी लगसकर हा कारणीभूत असल्याची फिर्याद त्यांचा दुसरा मुलगा पोपट निवृत्ती लगसकर यांनी दिल्यावरून मल्हारी निवृत्ती लगसकर याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात कलम ३०४ भादविनुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मल्हारी लगसकर यास ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रियाजोद्दीन शेख हे पुढील तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close