#Accident
विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू….!
केज दि.१५ – एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी जात असताना विजेच्या खांबाला स्पर्श होताच विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथे घडली.
हनुमंत पिंप्री येथील बाबुराव गणपतराव चंदनशिव वय ५५ वर्ष हे दि. १५ जून बुधवार रोजी दुपारी १ वा. च्या दरम्यान त्यांच्या शेतातील गट नंबर ४५/अ मधील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. मोटार सुरू करण्यासाठी जात असताना विजेच्या खांबाला त्यांचा स्पर्श होताच शॉक लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या बाबत मयताचे भाऊ हरिश्चंद्र गणपतराव चंदनशिव यांनी केज पोलीसात आकस्मिक मृत्यूची खबर दिली असून उत्तरीय तपासणीसाठी प्रेत उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.