ब्रेकिंग

शिंदे गटातील २१ आमदारांशी संपर्क, खा. संजय राऊत यांचा दावा…..!

8 / 100

मुंबई दि.२३ – एकवेळ महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडू, पण त्या आधी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं.वर्षावर आज शिवसेना आमदार ,कार्यकर्त्यांनी एकत्र जमत मीडियाशी संवाद साधला. यावेळी राऊत बोलत होते.

                     गुवाहाटी मधून पत्रव्यवहार करण्यापेक्षा किंवा मोबाईल वर बोलण्यापेक्षा मुंबईत या आणि बोला, हवं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण तुम्ही त्याआधी पुढच्या २४ तासात मुंबईत परत या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करा असं आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे.                     दरम्यान, भाजपने शिवसेना आमदारांचे अपहरण केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यासाठीच मी आज नितीन देशमुख आणि कैलास पाटील याना माध्यमांसमोर आणलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असून हे सर्व आमदार मुंबईत आल्यावर आमच्या सोबत असतील असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.राऊतांच्या या दाव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close