ब्रेकिंग

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी बाबत महत्वाची माहिती आली समोर……!

1 / 100
मुंबई दि.३० –  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती मिळत आहे.
                    शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  हे देखील गोव्याहून मुंबईकडे रवाना देखील झाले आहेत. ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. अशात शपथविधी संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आज शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 एकनाथ शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झालेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आजच शपथविधी होण्याची शक्यता आहे. दरबार हॉलमध्ये संध्याकाळी 7 ते 9 च्या दरम्यान दोघे शपथबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
               दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आणि महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close