क्राइम
भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीत चोरी…..!
केज दि.२ – येथील ऐन रहदारीच्या ठिकाणी असलेल्या केज कळंब रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्रीराम मोबाईल शॉपीच्या मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी झाली आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका जवळ आणि पोलीस ठाण्यापासून अवघ्या दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर सचिन ज्ञानोबा देशमुख (रा. वरपगाव ) यांचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे श्रीराम मोबाईल शॉपी आहे. दि. २ जुलै शनिवार रोजी मध्यरात्री २:०० च्या सुमारास चोरट्यानी मागील बाजूच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यानी आत प्रवेश केला मोबाईल शॉपीतील मोबाईल, हेड फोन, ब्ल्यू टूथ, पॉवर बँक, चार्जर आणि चार्जिंग कॉर्ड असे सुमारे एक लाख रु किमतीचे मोबाईल व साहित्य लंपास केले. परंतु तिजोरीत महागडे व नामांकित कंपन्यांचे मोबाईल ठेवलेले होते.मात्र सुदैवाने चोरट्याना तिजोरी फोडता न आल्यामुळे लाखो रु ची चोरी टळली. परंतु मोबाईल शॉपीत सीसीटीव्ही असून चोरट्यानी आत प्रवेश केल्या नंतरच्या हालचाली त्यात कैद झालेल्या असून एकाच्या तोंडावर मास्क आहे तर दुसऱ्याने कापडाने तोंड झाकले आहे.
दरम्यान मोबाईल शॉपीतील चोरीचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी पाचारण करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी आढळलेला एक टॉवेल श्वानला हुंगण्यास दिला असता श्वान हे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणा शेजारी असलेल्या मस्जिद परिसरात आणि केज-कळंब रोड जवळ त्याने माग काढला.