क्राइम
“त्या” खून खटला प्रकरणी ऍड.उज्वल निकम यांची नियुक्ती करा
आ. डॉ. निलम गोऱ्हे यांची मागणी
डी डी बनसोडे
July 5, 2020
जालना दि.५ – जालना जिल्ह्यातील मंठा येथे एका नवविवाहित १९ वर्षाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून गावातीलच मुलाने दि. ३० जून २०२० रोजी भरदिवसा गळा चिरून हत्या केली. आरोपीला तात्काळ अटक झाली आहे. दरम्यान या घटनेत वरिष्ठ वकील नेमण्याची मागणी केली होती. याबाबत आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जेष्ठ विधी तज्ञ अँड.उज्ज्वल निकम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून त्यांना सदरील केस घेण्याची विनंती केली. तातडीने आ.डॉ.गोऱ्हे यांनी केलेली विनंती मान्य करून ही केस स्वतः लढविण्यास तयार असल्याचे सांगितले. अँड.उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्तरावरील पाठपुरावा आ.डॉ.गोऱ्हे ह्या करत आहेत.
तसेच तपास पारदर्शक होत नसल्याची सामाजिक कार्यकर्ते तसेच खा.संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे यांनी आ. गोऱ्हे यांच्याकडे मागणी केली होती. या घटनेचे गांभीर्य व क्रूरता पाहता मंठा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांच्याकडून यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून वरिष्ठ स्तरावरून ह्या केसचा तपास होणे आवश्यक आहे. त्यासाठी परतूर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे हा तपास देऊन जालना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना या तपासात समाविष्ट करून घेण्यात यावे अशी सुचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना सूचना केल्या आहेत.