केज दि. ५ – सतत होणारी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून केज तालुक्यातील बनकरंजा येथील हनुमंत व्यंकटी मुंडे (34) या तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील रामचंद्र गणपती जायभाये या 58 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
केज तालुक्यातील बनकरंजा येथील हनुमंत मुंडे हे मागच्या तीन चार वर्षापासून शेतात होणारे नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. त्यातच त्यांनी रविवारी सकाळी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. तर धारूर तालुक्यातील जायभायवाडी येथील रामचंद्र जायभाय यांनीही बँकेचे कर्ज व अल्प उत्पादनाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शेतकरी आत्महत्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.