#Accident
केज कळंब रोडवरील अपघातातील जखमीचे निधन……!
केज दि.२ – मागील महिन्यात झालेल्या मोटार सायकल आणि मोपेडच्या अपघातातील गंभीर जखमी ज्ञानोबा इंगळे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
साळेगांव येथे बस स्टॅंडवर दि. १७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी १२.३० वा. च्या दरम्यान ज्ञानोबा अनंतराव इंगळे यांच्या मोपेड क्र. (एम एच-४४/ एक्स-१४७२) ला कळंब कडून येणाऱ्या मुदसिरोद्दीन मेहरोद्दीन काजी रा. उस्मानाबाद याच्या एफ झेड या मोटार सायकल क्र. (एम एच-२५/एस-७१४१) जोराचे धडक दिली होती. यात ज्ञानोबा इंगळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील संदर्भीय सेवेसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्या नंतर पुणे येथे हलविले होते.
दरम्यान दि १ सप्टेंबर रोजी ज्ञानोबा अनंतराव इंगळे यांचे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. २ सप्टेंबर शुक्रवार रोजी साळेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रस्त्यावर गतिरोधकाची मागणी
एक महिन्यात साळेगांव येथे चार अपघात घडले असून या हाय वेला राज्य रस्ता क्रॉस करीत आहे. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या खाजगी वाहने आणि रिक्षा यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाहीत. भरधाव वेगाने वाहने वाहत असल्याने गर्दीच्या ठिकाणी गतीरोधक उभारण्याची मागणी होत आहे.