#Accident

शॉक लागून आईसह दोन मुलांचा मृत्यू…..!

4 / 100

बीड दि.३ – गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांडा राठोड वस्तीवर विद्युत तारेचा शॉक लागून आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (दि. ३) दुपारी घडली आहे. महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ललीता श्रीकांत राठोड (वय ३०) अभिजीत श्रीकांत राठोड (वय-८), प्रशांत श्रीकांत राठोड ( वय – ११) अशी मृतांची नावे आहेत.

                    ललिता राठोड या दोन्ही मुलांसह शनिवारी दुपारी भेंडटाकळी तांडा शिवारातील आपल्या शेतात गेल्या होत्या. खेळत असताना दोन्ही मुलांचा खाली पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. दोघेही विजेचा धक्का बसल्याने कोसळल्याचे पाहून आई ललिता त्यांना वाचविण्यासाठी धावली. मात्र, त्यांना देखील विद्युत धक्का बसला. यात तिघांचाही मृत्यु झाला. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गौरी आगमनाच्या दिवशीच सदरील दुर्दैवी घटना घडल्याने गावावर शोक पसरला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close