क्राइम

बसमध्ये चढत असताना महिलेचे दागिने लंपास…..! 

1 / 100
केज दि.३० – येथील बसस्थानकातून बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
      केज शहरातील क्रांती नगर भागातील सुरेखा श्रीराम दांगट ही महिला २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नातेवाईक सुनिता मधुकर मोरे, द्वारका बाबुराव मोरे यांच्यासह धारूर तालुक्यातील अंबाचौंडी देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या. केज शहरातील बसस्थानकातून धारूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुरेखा दांगट यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीचे १६ ग्रॅमचे सोन्याचे मिनीगंठण तोडून घेत पोबारा केला. त्यानंतर अनोळखी चोरट्यांचा बसस्थानक परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मिळून न आल्याने त्या घराकडे निघून गेल्या. ३० सप्टेंबर रोजी सुरेखा दांगट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास जमादार श्रीकांत चौधरी हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close