महाराष्ट्र

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातही राहणार एक खुर्ची राखीव…..!

5 / 100
 मुंबई दि.5 – महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतल्या दसरा मेळाव्याकडे लागलंय. मुंबईत बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संपन्न होणार आहे. यासाठी बीकेसी ग्राउंडवर भव्य स्टेज उभारण्यात आलंय. विशेष म्हणजे या स्टेजवर एक खुर्ची रिकामी ठेवण्यात येणार आहे. हे बाळासाहेब ठाकरे  यांचं आसन असेल, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी या माहितीला दुजोरा दिलाय.
                       व्यासपीठावरील स्व. बाळासाहेब ठाकरेंसाठीचं हे आसन मेळाव्याचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे. आसनावर चाफ्याची फुले ठेवण्यात येणार आहेत.अशा प्रकारे पुष्पांजली वाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण या दसरा मेळाव्यात कायम ठेवली जाईल, असं सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्यासाठीची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
              दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा आहे. मात्र फक्त आमच्याच मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंचे विचार दिसून येतील, असा दावा शिंदे गटामार्फत करण्यात येतोय.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close