शेती

गंगामाऊली शुगरच्या साखर पोत्यांचे पूजन, शेतकरीवर्ग सुखावला…..!

12 / 100
केज दि.२० – गंगामाऊली शुगर (अशोकनगर, उमरी ता.केज या कारखान्यात मागच्या पंधरा दिवसांपूर्वी खासदार रजनीताई पाटील, माजीमंत्री अशोकराव पाटील, चेअरमन लक्ष्मणराव मोरे व संत महंतांच्या उपस्थितीत मोळी टाकली आणि प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात झाली.कारखान्याची दुरुस्ती अतिशय काटेकोरपणे केल्याने कसल्याही प्रकारचा अडथळा न येता गाळप सुरू झाले व उत्कृष्ट दर्जाची साखर बाहेर पडण्यास सुरुवात झाली.
              गाळप झालेल्या पहिल्या साखर पोत्यांचे पूजन अतिशय उत्साहात करण्यात आले.यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे, संचालक राहुल सोनवणे, कार्यकारी संचालक प्रवीण मोरे, संचालक अविनाश मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वाय. मुजावर, चीफ इंजिनिअर श्री.पतंगे, चीफ केमिस्ट श्री.सरवदे, शेतकी अधिकारी अविनाश आदनाक यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती.
              दरम्यान गंगामाऊली शुगर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने परिसरातील शेतकरीवर्ग सुखावला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close