केज तालुक्यातील बहुतांश गावांत प्रस्थापितांना जनतेने नाकारले…..!
केज दि.२० – तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींपैकी ६४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. आणि मंगळवारी निकाल घोषित झाला. यामध्ये प्रस्थापितांना जबरदस्त धक्का बसला असून जनतेने परिवर्तनाच्या लाटेत दिग्गजांना जागा दाखवून दिली.
केज तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या होत्या.त्यात २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि त्यात धक्कादायक निकाल लागले. यामध्ये दिग्गज नेत्यांना जनतेने स्पष्ट नाकारले.सकाळी दहा वाजता केज तहसीलमध्ये एकूण १४ टेबलवर मतमोजणी सुरू झाली.आणि त्यात धक्कादायक निकाल बाहेर येऊ लागले ते सायंकाळपर्यंत सुरूच होते. मागच्या दहा – पंधरा वर्षांपासून ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्या हातून ग्रामपंचायत निसटली.
केज तालुक्यात गावनिहाय निवडून आलेले सरपंच पुढील प्रमाणे……!
टाकळी – संगीता अनंत घुले, नागझरी – लक्ष्मी चंद्रसेन चौरे, बोरगाव ( बु. ) – बाळासाहेब गव्हाणे, मांगवडगाव – शिरीषकुमार हनुमंत इंगळे, लव्हूरी – पंडित वसंतराव चाळक, गांजी – श्रीहरी चंद्रसेन जाधव, साबला – जनाबाई नरहरी काकडे, चंदनसावरगाव – उषा जालिंदर दळवी, कुंबेफळ – अविनाश दिनकर पांचाळ, देवगाव – रुपाली अतुल मुंडे, मस्साजोग – संतोष पंडितराव देशमुख, पिसेगाव – हनुमंत शेषेराव नेहरकर, कोरेगाव – दत्ता किसन नागरगोजे, डोका – विमल गोरख भांगे, साळेगाव – कैलास पाटील, चिंचोलीमाळी – रोहिणी सुनील देशमुख, भाटुंबा – अश्विनी ज्ञानेश्वर चौरे, नाव्होली – इंदुबाई रणजित बिक्कड, धनेगाव – आकांक्षा आदेश गुजर, बावची – मनिषा सुरेश नांदे, सांगवी ( सा. ) – लक्ष्मी संजय केदार, कासारी – अमोल लक्ष्मण डोईफोडे, सारणी ( आ. ) – प्रविणा संतोष सोनवणे, लाडेवडगाव – इंदूबाई पंढरीनाथ शेप, दहिफळ वडमाऊली – डॉ. अनिता शशिकांत गदळे दहिफळकर – रा. काँ. – भाजप, कळंमअंबा – शशिकांत इंगळे – अपक्ष, गोटेगाव – मंजुषा शहाजी पवार, तांबवा – दीपाली अरुण चाटे, केकतसारणी – अनिता शिवदास काळे, जिवाचीवाडी – प्रेरणा दीपक काळे, एकुरका – प्रशांत केदार, सादोळा – अंगद इंगळे, पिंपळगाव – सचिन राजेभाऊ गायकवाड, केवड – उषा बाळासाहेब सत्वधर, सोनीजवळा – जानवी गोविंद ससाणे, कानडी माळी – अशोक श्रीमंत राऊत, सोनेसांगवी – मुकुंद कणसे, आनंदगाव ( सा. ) – अंजना गोविंद गायकवाड, सातेफळ – कृष्णा थोरात, कौडगाव – नारायण नरसिंग महाकुंडे, सावळेश्वर – मारोती बाबुराव कांबळे, इस्थळ – अविनाश श्रीकिशन भालेकर, कानडीबदन – डिगांबर नारायण पांचाळ, दीपेवडगाव – दीपक नरहरी गुळभिले, जवळबन – संध्या प्रमोद करपे, माळेवाडी – सुदाम तात्याराम हाके, पळसखेडा – वसंत बळीराम चव्हाण, उमरी – सुमन विश्वंभर मुळे, लाडेगाव – अंकुश यशवंत अंबाड, सारणी ( सां. ) – शीला राहुल ओव्हाळ, ढाकेफळ – रतन अंधारे, हदगाव – उमेश यादव, सौंदाणा – दीपाली दीपक भिसे, केळगाव/ बेलगाव प्रणिता खंडेराव चौरे