क्राइम
केज तालुक्यातुन अल्पवयीन मुलीचे अपहरण… .!
केज दि.22 – एका १७ वर्षे ११ महिने वयाच्या मुलीचे १५ डिसेंबर रोजी रात्री तिच्या गावातून अपहरण केल्याप्रकरणी एक जणांविरुद्ध युसूफ वडगाव ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील १७ वर्षे ११ महिने वयाची मुलगी व तिची आई या दोघी अंबाजोगाई येथे क्लाससाठी वास्तव्यास होत्या. दिवाळीनंतर क्लास संपल्याने आता ही मुलगी गावी होती. १५ डिसेंबर रात्री ही मुलगी तिच्या आजी – आजोबाच्या रुममध्ये अभ्यास करते असे सांगितल्याने आई – वडिल झोपले. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मुलगी घरात नसल्याने आजोबांनी तिच्या वडिलांना ही माहिती दिली. त्यानंतर मुलीचा गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा तपास न लागल्याने अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी युसुफवडगाव पोलिसात दिली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून जमादार रंगनाथ राठोड हे तपास करताहेत.